लखनऊ - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील प्रसिद्ध गोरक्षनाथ मंदिरात रविवारी संध्याकाळी ७ वाजता घडलेल्या एका घटनेने सगळ्यांची झोप उडवली आहे. याठिकाणी मंदिराच्या गेटमधून एक युवक वेगाने धावत येऊन सुरक्षेसाठी तैनात असलेला जवान गोपाळच्या हातातून शस्त्र हिसकावून घेऊ लागला. सुरक्षा जवानाला काही कळायच्या आत या युवकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला सुरू केला. जवानावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या अहमद मुर्तझा अब्बासीबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. अहमद मुर्तजा अब्बासी यांच्याशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे. आरोपी अहमद मुर्तजा अब्बासी हा गोरखपूरच्या सिव्हिल लाइन भागातील रहिवासी आहे. मुर्तझा अब्बासी याचे वडील मोहम्मद मुनीर हे अनेक वित्त कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार होते.
अहमद मुर्तझा अब्बासी यांनी २०१५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. २०१५ मध्ये इंजिनिअरिंगमधून उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आणि नंतर एस्सार पेट्रोकेमिकल्समध्ये नोकरी केली. त्याचं लग्न झालेलं असून त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अहमद मुर्तझा अब्बासी याच्यावर अनेक डॉक्टरांनी उपचार केले असून, तो मुंबईत राहत होता. मुर्तझा अब्बासी याच्यावर अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून अहमद मुर्तझा अब्बासी याच्या मित्रांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या.
आरोपी मुर्तझा अब्बासीचे पहिले लग्न ठरवाताना चर्चेदरम्यान मोडले होते. अब्बासी याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले मात्र तिनेही सोडचिठ्ठी दिली. दरम्यान, मुर्तझा अब्बासी याने केलेल्या गोरखपूर येथील हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो पोलिसांवर हल्ला करताना दिसत आहे.