कल्याण: येथे चोरट्यांनी एका महिलेचे दागिने लुटले आणि पोबारा केला. पण सीसीटीव्हीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना माहिती नव्हते की ते दोघे सीसीटीव्हीत कैद झालेले आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या सहाय्याने या चोरट्यांचा शोध घेत होते. त्या दरम्यान दोघे एका बाईकवर फिरत असल्याची माहिती खबरींनी पोलिसांना दिली आणि दोघे पकडले गेले. आदेश बनसोडे आणि अमित पाल अशी या चोरट्यांची नावे आहेत. यांच्याकडून चोरीस गेलेल्या तीन बाईक, पाच मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व भागातील विजयनगर परिसरात एका महिलेचे चैन आणि दागिने हिसकावून दोन चोरटे बाईकवरुन पसार झाले. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरीदास बोचरे आणि दीनकर केदारे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांकडून जवळपास ४७ सीसीटीव्ही चेक करण्यात आले. काही सीसीटीव्हीत दोन संशयित तरुण एका बाईकवर फिरताना दिसून आले. महिलेकडून आणि काही नागरीकांकडून चोरटय़ांची हीच बाईक होती असे सांगितले गेले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. खब:यांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की, त्याच बाईकवर कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरात फिरत आहे. पोलिसांनी सापळा रचून त्या दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.