शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
2
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
3
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
4
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
5
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
6
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
7
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
8
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
9
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
10
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
11
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
12
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
13
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
14
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
15
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
16
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
17
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
18
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
19
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
20
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती

बंद खोलीत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, ट्यूशन शिक्षिकाने बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 7:08 PM

Rape And Murder Case : रविवारी मेडिकल बोर्डाकडून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आज सकाळी तिचा मृतदेह पोलिसांनी अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

कोटा : नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांचे हात अजूनही रिकामेच आहेत. अशा स्थितीत या प्रकरणाच्या तपासासाठी १२ हून अधिक पथके तयार करून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. रविवारी मेडिकल बोर्डाकडून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आज सकाळी तिचा मृतदेह पोलिसांनी अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

मात्र, आरोपी ट्युशन शिक्षकाला अटक न केल्याने आज अनेक बाजारपेठा बंद ठेवून निषेध व्यक्त केला. त्याचवेळी रामपुरा कोतवालीच्या बाहेर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व्यापारी महासंघ रात्रीपासून धरणे धरून बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने रामपुरा कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली. मात्र, पोलीस याला दुजोरा देत नाहीत. आरोपी शिक्षकाला अटक न केल्याने संतप्त झालेल्या शहरातील अनेक व्यावसायिकांनी आज आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज शहरातील अनेक बाजारपेठा बंद राहणार आहेत. या व्यावसायिक आणि कामगार संघटनेची मागणी आहे की मारेकरी शिकवणी शिक्षक गौरव जैनला तात्काळ अटक करण्यात यावी, ज्याने मुलीवर निर्दयीपणे बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि अयशस्वी होऊन तिची हत्या केली.कोटा शहराचे एसपी केसर सिंह शेखावत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी डझनहून अधिक टीम तयार केल्या आहेत, जे आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आरोपीच्या पलायनाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये तो उत्तरी बायपासवरील कोटा शहरातील नयापुरा, रंगपूर आणि भडाना या भागात गेला आहे. मात्र, आता या संदर्भात पोलीस तपास करत असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

माझं तुझ्या मुलीवर प्रेम आहे, तिला माझ्या स्वाधीन कर नाहीतर ॲसिड फेकेन... माथेफिरू प्रियकराची करतूद

खासदार राजेंद्र गावित यांना कोर्टाचा दणका, कोर्टाने सुनावली शिक्षा अन् रक्कम भरण्याचे दिले आदेशवैद्यकीय अहवालानुसार अल्पवयीन मुलीच्या पोटावर आणि बोटांवर जखमा आहेत. यासोबतच मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ही संपूर्ण घटना एका व्यक्तीने केली नाही. अशा स्थितीत पोलिसांनी बारकाईने तपास करून या प्रकरणात दोषी कोण आहे, त्याचीही चौकशी झाली पाहिजे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थी