शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंवर 'अँजिऑप्लास्टी'; ब्लॉकेज आढळल्यानं लगेचच शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
2
महायुतीच्या घोषणांना काँग्रेस जोरदार उत्तर देणार; महाराष्ट्रासाठी जाहीरनाम्यात ३ मोठी आश्वासने असणार?
3
“हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नका”; आता काँग्रेस आमदाराची मागणी, पण कारण काय?
4
Gold Silver Price : दिवाळीपूर्वी सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर; चांदीची चमकही वाढली; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर 
5
पृथ्वी शॉ,अंजिक्य अन् अय्यरचा फ्लॉप शो; पांड्याच्या संघानं मुंबईला दिला पराभवाचा धक्का!
6
म्हणून आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी राजकुमार राव करतो उपवास! कारण ऐकून थक्क व्हाल
7
इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी खपवून घेणार नाही; CM एकनाथ शिंदेंचा इशारा
8
टोल माफीनंतर एसटी प्रवाशांसाठी सरकारचा मोठा निर्णय; दिवाळीत मिळणार दिलासा
9
कोरोना लसीमुळे दुष्परिणाम, दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, संतप्त सरन्यायाधीश म्हणाले...
10
“मनोज जरांगेंनी २८८ जागांवर उमेदवार उभे करावेत, आम्ही स्वागतच करू”; लक्ष्मण हाकेंचे आव्हान
11
अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून
12
China-Taiwan Conflict : चीननं तैवानला चारही बाजूंनी घेरलं; लष्करी सराव सुरू, २५ लढाऊ विमानांसह ७ युद्धनौकांनी दाखवली ताकद!
13
अजितदादांच्या आमदाराचा पारा चढला; महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनाच इशारा
14
PAK vs ENG : पाकिस्तानची 'कसोटी'! इंग्लंडने उतरवला तगडा संघ; घरच्या मैदानात लाज राखण्याचे आव्हान
15
Diwali Muhurat Trading 2024: दिवाळीच्या दिवशी केव्हा होणार मुहूर्त ट्रेडिंग; तुम्हीही खरेदी करणार का?
16
टोलमाफी, २ नदीजोड प्रकल्पांना मंजुरीसह राज्य मंत्रिमंडळाने घेतले १९ मोठे निर्णय
17
BSNL : बीएसएनएलचा परवडणारा प्लान; रोज २ जीबी डेटा ; अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा केवळ ७ रुपयांचा खर्च
18
"लग्नाबाबत सगळ्यात आधी राज ठाकरेंना सांगितलं, कारण...", अंकिता वालावलकरचा मोठा खुलासा
19
"या कामाची पोचपावती जनता निवडणुकीत देईल"; टोलमाफीच्या निर्णयावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
20
DMart Share : २०१९ नंतर पहिल्यांदाच एका दिवसात Dmart च्या शेअरमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांना कसली भीती?

मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहाच्या खोलीत आढळला विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

By मनीषा म्हात्रे | Published: June 06, 2023 9:33 PM

मरीन ड्राईव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील एका वसतिगृहाच्या एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास समोर आली. बलात्कार करून तरुणीची हत्या केल्याचा संशय वर्तविण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहे. तरुणी मूळची अकोला येथील असून तिचे वडील पत्रकार आहे. तिच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते मुंबईकडे येण्यास निघाले आहे.

मरीन ड्राईव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत ती विवस्त्र अवस्थेत आढळून आली.  

तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.  तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत, पोलीस अधिक तपास करत आहे. सुरक्षा रक्षक सकाळपासून गायब असल्याने एक पथक सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहे. 

सुरक्षा रक्षकाची आत्महत्या?

पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह मिळून आला आहे. आरोपी नाव ओमप्रकाश कनोजिया जवळपास १५ वर्षांहुन अधिक काळ तिथे वॉचमन म्हणून काम करत होता. संशयित आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकाने सकाळी ६ वाजता चर्नीरोड ते ग्रँटरोड स्थानका दरम्यान लोकल समोर येत आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येचे सीसीटिव्ही ताब्यात घेतले आहेत. त्याच्या वडिलांनीही त्याचा मृतदेह ओळखला आहे. याबाबत मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहे

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबईPoliceपोलिस