उज्जैन : असं म्हणतात की आई ही मुलांसाठी सावली असते, जी वेळ पडल्यावर आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार असते. जीवाची पर्वा न करता ती सर्व संकटांशी लढते. मात्र, उज्जैनमधील ही घटना समोर आल्यानंतर या सर्व गोष्टी निव्वळ तत्त्वज्ञान वाटतील. येथे एका आईने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. तिने तिला उचलून जमिनीवर आपटले आणि मुलगी रडायला लागल्यावर तिने उचलून बाहेर फेकले. निर्दयी आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.व्हिडिओ समोर आलाहे प्रकरण उज्जैनपासून ४५ किमी अंतरावर असलेल्या बडनगर येथील जुनाशहरचे आहे. आई किती निर्दयी आहे हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आई मुलीला झाडूने मारहाण करून जमिनीवर फेकते. निरागस रडत ओरडत राहिली, पण आईच्या मनाला पाझर फुटला नाही. यानंतर एक हात वर करून तिला घराच्या दरवाजाबाहेर फेकले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाइल्ड लाइनने याप्रकरणी कारवाई केली आहे.पुढे काय झालं?चाइल्ड लाईन टीमने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. ही महिला दररोज आपल्या मुलाला बेदम मारहाण करत असल्याचे समजले. महिलेचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चाइल्ड लाइनने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कारवाईनंतर मुलीला मातृछाया संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला महिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.मुलीच्या स्थितीत सुधारणाटीआय मनीष मिश्रा यांनी सांगितले की, या घटनेत मुलीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचवेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष शेर सिंह यांनी सांगितले की, महिलेविरुद्ध भादंवि कलम 75 आणि कलम 323 जेजेएस (जुवालियन जस्टिस सेक्शन 2015) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानंतर आणखी कलम वाढवले जाऊ शकतात.आई बलात्कार पीडित आहेमहिला स्टेशन प्रभारी रेखा वर्मा यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी चरक हॉस्पिटलमध्ये महिलेवर बलात्कार झाला होता. तिला साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले. कोर्टाने हजर न राहिल्याने तिच्यावर अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. सध्या बडनगर पोलिसांनी महिलेला आमच्या ताब्यात दिले, त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात आले. हे म्हणणे मांडल्यानंतर न्यायालयाने तिला पुढच्या सुनावणीस बोलावून सुटका केली.
दीड वर्षाच्या मुलीसोबत आईने केले हे क्रूर कृत्य, व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 8:45 PM