शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

समोर सोफ्यावर बसले अन् अचानक केली फायरिंग,समोर आले सुखदेव गोगामेडी यांच्या हत्येचे CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2023 5:33 PM

ही घटना सुखदेव यांच्या श्यामनगर येथील घरात घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे...

राजस्थानातील जयपूरमध्ये राजपूत करनी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक हल्लेखोरही मारला गेला आहे. गोगामेडी, त्यांच्या एका सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोरासह 4 जणांना गोळी लागली आहे. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला अससून, सुखदेव गोगामेडी यांच्या सुरक्षा रक्षकाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सुखदेव यांच्या श्यामनगर येथील घरात घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

जयपूरचे पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसेफ यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, 'येथे तीन लोक आले आणि त्यांनी सुखदेव यांच्या कर्मचाऱ्यांकडे गोगामेडी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. यावर गोगामेडी यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना (सुखदेव गोगामेडी) विचारले. याला त्यांनी परवानगी दिली. यानंतर, ते तिघेही आत गेले. तेथे त्याच्यात सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. यानंतर गोळीबार झाला ज्यात सुखदेव गोगामेडी यांचा मृत्यू झाला. शेजारी उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकालाही गोळी लागली आहे. त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे."

क्रॉसफायरिंगमध्ये हल्लेखोराचाही मृत्यू -जोसेफ म्हणाले, यावेळी झालेल्या क्रॉसफायरिंगमध्ये तीन तीन हल्लेखोरांपैकी एकाचा मृत्यूही झाला आहे. नवीन सिंह शेखावत असे त्या हल्लेखोराचे नाव आहे. तो मुळचा शापुरा येथील रहिवासी होता. तो जयपूरमध्ये कपड्याचे दुकान चालवत होता. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्म घटना कैद झाली आहे. हल्लेखोराची ओळक पटवली जात आहे. लवकरच हल्लेखोर पकडले जातील. तसेच घटनेच्या मुळाशी जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचले जाईल. यातच, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रोहित गोदाराने सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

स्कॉर्पिओमध्ये आले अन् स्कूटीवरून पळाले -पोलीस आयुक्त म्हणाले, हल्लेखोर स्कॉर्पिओने आले होते. मात्र गाडी चालवणाऱ्या नवीनचा मृत्यू झाल्याने त्यांना त्या गाडीतून पळून जाता आले नाही. त्यांनी एक स्कुटी हिसकावत त्यावरून पळ काढला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार