बसमध्ये ड्रायव्हर, कंडक्टरसह क्लिनरने महिलेवर केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 05:14 PM2022-03-13T17:14:16+5:302022-03-13T17:56:17+5:30
Gangrape Case :पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मनावर येथे शुक्रवारी संध्याकाळी एका महिला प्रवाशावर बस चालक, कंडक्टर आणि क्लिनरने सामूहिक बलात्कार केला. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मनावर येथील गुलाटी रोडवरील काळे पाटेजवळ बसमधून महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. त्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. लोकांनी जाऊन पाहिले तर बसमध्ये एक महिला घाबरलेली बसली होती. बसचा क्लिनर पंकज, कंडक्टर गंगाराम आणि चालक कमल बसमध्ये होते. गर्दी पाहून तिघेही तेथून पळून गेले. तेथे जमलेल्या लोकांनी महिलेला मनवर पोलिस ठाण्यात नेले.
यासंदर्भात एसडीओपी धीरज बब्बर यांनी सांगितले की, बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच तिन्ही आरोपींना अटक करण्यात येईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, भगवती बसमध्ये एक महिला कुक्षीला बसमध्ये बसली होती. तिने कंडक्टरला रोंगसलीजवळ उतरण्याबाबत सांगितले असता कंडक्टरने तिला रोंगसली निघून गेलं आहे, तुम्ही गांधवाणी येथे उतरा असं सांगितलं.
कंडक्टरने महिलेची बॅग दिली नाही
महिला गंधवणीत उतरल्यावर कंडक्टरने तिची बॅग दिली नाही आणि आम्ही तुम्हाला मनावरमध्ये बॅग देतो, मग मनावर येथे उतरा, असे सांगितले. अशात बस कंडक्टरने महिलेला पुढे नेले. बसमधील सर्व प्रवासी मनावर येथे उतरले असता, कंडक्टरने महिलेला घरी सोडण्याच्या प्रकाराबाबत बसमध्ये बसवून ठेवले. यानंतर आरोपीने बस एका कच्च्या रस्त्यावर नेली, तिथे कंडक्टरने महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.