इंदूर : चंदनगर पोलीस स्टेशन परिसरात सकाळी इंदूर महापालिकेच्या कचरा पेटीमध्ये दोन मृत नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या चंदननगर पोलिसांनी दोन्ही नवजात बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आणि जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. सकाळी कचरापेटी रिकामी करण्यासाठी सफाई कर्मचारी पोहोचले असता मृत नवजात अर्भक सापडल्याची माहिती मिळाली. मृत नवजात अर्भक पॉलिथिनने बांधलेले आढळले.सकाळी नेहमीप्रमाणे कचरापेटीमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेचे कचरावेचक वाहन धार रोडवर पोहोचले. यादरम्यान महामंडळाच्या कर्मचाऱ्याला पॉलिथिन पिशवी जड जाणवली असल्याने ती उघडली असता तो आश्चर्यचकित झाला. पिशवीत 2 मृत नवजात अर्भक होती. याबाबत त्यांनी महापालिका नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर चंदननगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. नवजात बालकांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होते.
क्राइम :पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे व्यथित बलात्कार पीडितेने पोलीस स्टेशनबाहेर केला आत्मदहनाचा प्रयत्नकाही वर्षांपूर्वी रावजी बाजार परिसरातील नाल्याजवळ नवजात अर्भक आढळून आल्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी करून हातावर बांधलेल्या टॅगच्या आधारे तरुण, तरुणी आणि मुलीच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पुरेशा पुराव्याअभावी हा खटला कोर्टात चालला. तिघांनाही दोषी ठरवले नसल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होते, हे पाहावे लागेल.