चंडीगड : अभिनेत्रींसारखे कपडे खरेदी करण्याचा हट्ट करणाऱ्या पत्नीला पतीने घटस्फोट दिला. त्यावर पंजाब कोर्टाने शिक्कामोर्तब केले. कौटुंबिक न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निकालावर पत्नीने आव्हान दिले होते. गुरुग्राममध्ये राहत असलेल्या पतीच्या याचिकेवर कोर्टाने घटस्फोटाचे आदेश दिले होते.
पतीने सांगितले होते की, पत्नी रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहते. अभिनेत्री जसे कपडे परिधान करतात, तसे कपडे परिधान करण्याचा हट्ट करते. त्यासाठी दबाव आणते. २००८ मध्ये विवाह झाल्यापासून तिचा स्वभाव तापट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरून पतीशी ती भांडते. घरातील कोणतेच काम करत नाही. घरी पाहुणे आले तर चहासुद्धा करत नाही.
न्यायालयही म्हणाले, पत्नी क्रूरन्यायालयात पतीने सांगितले की, पत्नीने अनेकदा आपल्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिलेली आहे. तपासात तिची तक्रार खोटी असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला क्रूर ठरवत घटस्फोटाचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध पत्नीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पत्नीचे जबाब वारंवार बदलत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. पत्नीने २०१४ मध्ये घर सोडले होते. त्यानंतर तिने मुलांनाही भेटण्याचा प्रयत्न केला नाही.