मुंबई- टुरिस्ट कंपनीच्या गाडीतून ड्रग्स व वापरलेले कंडोम पोलिसांनी जप्त केले. ते सोडविण्यासाठी न्यायधीशांपर्यंत पैसे दाबावे लागतील, अशी भीती घालत मालकिणीला ५२ लाखांचा गंडा घालणाऱ्या सोहेल खानसह तिघांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खानवर विश्वास असल्याने पीडिता आपल्या टुरीस्ट कंपनीची जबाबदारी त्याच्यावर सोपवत हरयाणाला निघून गेली होती. दरम्यान, खान याने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी पीडितेला सांगितले की आरटीओ अधिकायांनी गाडीच्या केलेल्या पाहणीत ड्रग्स व वापरलेले कंडोम मिळाले असून, गाडीच्या मालकावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करणार, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी घाबरल्याने केस मी माझ्या लिहून देतो. मात्र, मी तुमच्या गाडीचा केअर टेकर असल्याचं स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, असे सोहेलने सांगितले. फिर्यादींनी तसे कागदपत्र २३ फेब्रुवारी २०२० रोजी त्याला व्हॉट्सअॅपवर पाठवले.
माफीनामा दिल्यानंतरही बेदम मारहाण
कारवाई टाळण्यासाठी पोलिस, न्यायालयातील वकील व जज यांना देण्याकरिता आरोपीने पीडितेकडे पैसे मागितले जे पीडितेने झहीर नामक एजंटच्या खात्यात पाठवले. सोहेलने माफीनामा दिल्यानंतरदेखील पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे वकिलाच्या फीसाठी पैशांची मागणी करत ५२ लाख आरोपींनी उकळले. त्यानुसार सोहेल, त्याची पत्नी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून आम्ही आरोपीचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी 'लोकमत'ला सांगितले.