राजस्थानच्या भरतपूरमध्ये विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीचीच हत्या केली होती. यानंतर त्याचा मृतदेह जवळच्याच कालव्यात फेकला होता. सासऱ्याने मुलगा बेपत्ता असलाची तक्रार पोलिसांत दिली होती. परंतू, गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना या व्यक्तीचा काही सुगावा लागला नाही.
दिवसामागे दिवस जात राहिले, एके रात्री या सासऱ्याने त्याच्या सुनेला एका तरुणासोबत शरीर संबंध ठेवत असताना पकडले आणि सारा खेळच खल्लास झाला. सासऱ्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी खाक्या दाखविताच सून आणि तिचा प्रियकर दोघांनीही तिच्या पतीसोबत काय काय केले ते सारे सांगून टाकले. नौह गावातील हा प्रकार आहे. पवन शर्मा नावाच्या व्यक्तीचे लग्न २०१५ मध्ये झाले होते. उत्तर प्रदेशच्या कानपूरची राहणारी २३ वर्षीय रीमा त्याची पत्नी बनली. त्यांना दोन मुलेही झाली. मात्र, या काळात रीमाचे शेजारचा भागेंद्र उर्फ भोलावर प्रेम जडले. या दरम्यान त्यांच्यात शरीर संबंधही सुरु झाले.
२९ मे २०२२ च्या रात्री पती पवन झोपलेला असताना त्याला आवाज येऊ लागल्याने जाग आली. त्याने लाईट लावून पाहिले तर त्याची पत्नी विवस्त्रावस्थेत शेजारी भोलासोबत होती. पवनने दोघांनाही रंगेहाथ पकडले होते. यावेळी रीमाने भोलासोबत मिळून पवनची हत्या केली. त्याच रात्री दोघांनी त्याचा मृतदेह कालव्यात फेकला. आठवड्याभराने पवनच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केली होती.
पतीला मारल्यानंतर पत्नी आणि तिचा प्रियकर रोज रात्री भेटत असायचे. १६ ऑक्टोबरला त्यांचे बिंग फुटले. पवनच्या वडिलांनी दोघांनाही तशा अवस्थेत पाहिले आणि संशय आला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी सुरु केली. त्यांनी गुन्हा कबुल करताच त्यांना कालव्याजवळ नेण्यात आले. गोताखोरांनी कालव्याच्या पाण्यातून मृत पवनची पॅन्ट, आधारकार्ड आणि काही हाडे मिळविली आहेत.