सिंगरौली : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील माडा पोलीस स्टेशन हद्दीतील बधौरा चौकीत एक अनोखी घटना समोर आली आहे, जिथे एक प्रेमी युगल अनेक दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. पण मुलाच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. बराच काळ लोटला, जेव्हा मुलाचे घरचे लग्नाला तयार होत नव्हते, तेव्हा मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना तिने तिची व्यथा सांगितली.
यानंतर माडा पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेंद्र सिंह चौहान यांनी मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावले. मुलगी आणि मुलगा दोघांच्याही कुटुंबीयांना बसवून समजावून सांगण्यात आले. नंतर दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सहमती दर्शवली, त्यानंतर पोलिसांनी त्यांना एका मंदिरात नेऊन लग्न लावून दिले. दोघेही लग्नाचे फेरे घेत असताना पोलीस स्टेशन प्रभारी आणि पोलीस लग्नाचे साक्षीदार बनून फुलांचा वर्षाव करत होते.
रेल्वे स्टेशनवर महिलेवर आळीपाळीने केला गँगरेप, पतीला केली मारहाणसिंगरौली जिल्ह्यातील रैला गावातील रहिवासी दिलीप शाह यांचे जवळच्याच गावातील सखोऊहा येथील रेखा शाहसोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा या दोघांच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच मुलीचे आई-वडील लग्नासाठी तयार झाले, मात्र मुलाच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी बोलणी पुढे जात नव्हती तेव्हा रेखाने स्टेशन प्रभारींकडे तक्रार केली.
सख्ख्या बहिणींवर बलात्कार, एका आरोपीने केली आत्महत्या, तर दुसऱ्या आरोपीने...
स्टेशन प्रभारींनी औदार्य दाखवत दोघांच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून परस्पर सामंजस्य करार करून मंदिरात लग्न लावून दिले. हा विवाह होत असताना मुलीचे कुटुंबीय, मुलाचे आणि पोलीस साक्षीदार होते. आता या लग्नाची चर्चा आणि पोलिसांच्या औदार्याचे जोरदार कौतुक होत आहे. प्रेमी युगुल पोलीस कर्मचाऱ्याचे खूप आभार मानत आहे.