शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

पित्यानेच आवळला गतिमंद मुलीचा गळा; आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 7:03 AM

आईच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : बापाने १० वर्षीय गतिमंद मुलीचा गळा आवळून तिचा खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना पूर्वेकडील मानपाडा, माणगाव परिसरातील हरी म्हात्रे चाळीत रविवारी रात्री घडली. लवली मनोज अग्रहारी, असे मृत मुलीचे नाव आहे. दरम्यान, मनोज (३८) या निर्दयी बापाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत मुलीची आई लीलावती हिने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लीलावती या बाहेर घरकाम करतात. त्यांना चार मुली आहेत. एक मुलगी गावी तिच्या आजीकडे राहते, तर इथे तीन मुली राहतात. पती आरोपी मनोज एका किराणा स्टोअरमध्ये मालाच्या डिलेव्हरीचे काम करतो. त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद असून तिला बोलता आणि ऐकूही येत नव्हते. तिच्यावर उपचार करूनही कोणताही फरक पडत नव्हता. मनोजला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन पत्नी लीलावती आणि चारही मुलींना मारझोड करायचा. लवली हिला मारहाण करताना हिचा तर काहीच उपयोग नाही, हिला एकदाचे कायमचे संपवावे लागेल, असे नेहमी बोलायचा. मागील आठवड्यातही त्याने घरात कोणी नसताना लवलीला मारहाण केली होती. यात तिच्या कमरेला दुखापत झाली होती. 

    रविवारी सायंकाळी पत्नी लीलावती घरकामासाठी, तर मोठी मुलगी कोमल (१४) ही कामानिमित्त बहीण तनू (४) हिला घेऊन बाहेर गेली होती.    घरात कोणी नसल्याचे पाहून मनोजने लवलीचा गळा आवळून खून केला आणि तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मानपाडा पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेत मनोजला अटक केली.

‘लवली मर गई है, जाकर देखो’आरोपी मनोजची मोठी मुलगी कोमल भंगार दुकानात साफसफाईचे काम करते. लवलीचा खून केल्यावर घराबाहेर पडलेला मनोज तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘लवली मर गई है, जाकर देखो’, असे तिला सांगून तो पसार झाला. कोमलने लागलीच घर गाठले असता लवली निपचित पडल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने याची माहिती आई लीलावतीला दिली. त्यांनत लीलावतीने तातडीने याची माहिती पोलिसांना कळविली.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी