नैराबी - केनियाच्या पोलिसांनी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांच्या तपासादरम्यान देशाच्या पूर्वेकडील कब्रस्तानातून अनेक मृतदेह काढले आहेत. हे मृतदेह अशा लोकांचे आहेत ज्यांचा असा विश्वास होता की जर त्यांनी स्वतःला मारले तर ते स्वर्गात जातील. रविवारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांची संख्या ४७ आहे. ज्या जमिनीवर हे मृतदेह सापडले ती जमीन एका ख्रिश्चन पादरीची आहे. अनुयायांना आमरण उपोषण करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पादरीला अटक करण्यात आली आहे.
आणखी थडगे खोदले जाणारमालिंदी उप-काउंटी पोलिस प्रमुख जॉन केंबोई म्हणाले की, पादरी पॉल मॅकेन्झी यांच्या जमिनीवर अजून काही थडगे खोदणे बाकी आहे. पादरी पॉल मॅकेन्झी यांना १४ एप्रिल रोजी तांत्रिक प्रकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मृतांची एकूण संख्या वाढू शकते. गेल्या आठवड्यात गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चमध्ये भुकेने चार जणांचा मृत्यू झाला. मॅकेन्झीला अधिक काळ कोठडीत ठेवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे कारण त्यांच्या अनुयायांच्या मृत्यूचा तपास सुरू आहे.
पोलिसांना गेल्या आठवड्यात पहिला मृतदेह सापडला होता. यानंतर त्यांनी उर्वरित मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू केली. किलीफी परगण्यातील मालिंदीजवळील शाखोला येथील ३२५ हेक्टर (८०० एकर) जंगलात मृतदेह शोधण्यासाठी शुक्रवारी खोदकाम सुरू झाले. केनियाचे गृहमंत्री किथुरे किंडिकी यांनी मंगळवारी घटनास्थळाला भेट देणार असल्याचे सांगितले होते. रविवारी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी ऑपरेशननंतर सापडलेल्या मृतदेहांचा उल्लेख 'शाकाहोला जंगल हत्याकांड' असा केला. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
प्रभूला भेटवण्याचं वचनपादरी आणि पंथ नेते पॉल मॅकेन्झी यांच्या मालकीच्या जमिनीवर आणखी कबरे खोदली जातील. केनियाच्या एनटीव्ही वाहिनीने मॅकेन्झीने अटक झाल्यानंतर तुरुंगात उपोषण सुरू केल्याचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, वाचलेल्या १५ उपासकांना उपाशी राहण्यास सांगितले होते जेणेकरून ते त्यांच्या निर्मात्याला म्हणजेच देवाला भेटू शकतील. त्यापैकी चौघांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला अशी माहिती मालिंदी उप-काउंटी पोलिस प्रमुख जॉन केंबोई यांनी दिली. प्रथमोपचार घेण्यास नकारहाकी आफ्रिका गटाचे सदस्य हुसेन खालिद म्हणाले की, चर्चच्या एका अनुयायाने वेदना होत असतानाही खाण्यास नकार दिला. याच संस्थेने चर्चमध्ये सुरू असलेल्या कारवाईची माहिती पोलिसांना दिली. या अनुयायाने प्राथमिक उपचार करण्यास नकार दिला. त्याने आपले तोंड घट्ट बंद केले, मुळात त्याला उपोषण चालू ठेवायचे होते म्हणून मदत घेण्यास नकार दिला. चर्चचे काही सदस्य अजूनही जवळच्या जंगलात अधिकाऱ्यांपासून लपून बसले आहेत असं खलिद यांनी दावा केला.