शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

तरुणीच्या शरीरावर चाकूने वार, जंगलात फेकला मृतदेह; त्याच्याच शेजारी मोबाइल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 12:26 PM

एका प्रवाशाच्या नजरेस हा मृतदेह पडला.

कसारा : शहापूर तालुक्यातील कसारा नजीकच्या जंगलात गुरुवारी सायंकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत दाेन आरोपींना अटक केली आहे. आराेपी आणि तरुणी दाेन वर्षांपासून लिव्ह ॲण्ड रिलेशनशिपमध्ये राहत हाेते. काही महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरू हाेते. या वादातून तरुणीला कसाऱ्याजवळील जंगलात नेऊन तेथे आराेपीने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जंगल भागातील रस्त्याच्या कडेला वारलीपाडा गावानजीक २१-२५ वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला असल्याची माहिती कसारा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दिली. एका प्रवाशाच्या नजरेस हा मृतदेह पडला. त्यानेच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. 

पंचनामा करून मृतदेह शहापूर मधील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केलेल्या अनेक जखमा आढळल्याने पोलिसांनी अनाेळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेहाशेजारी पाेलिसांना माेबाइल सापडला. त्यामुळे तपासाला गती मिळाली.

मोबाइलच्या मदतीने काढला माग

पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक दीपाली धाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप गीते, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी मनोरे, पाेलिस उपनिरीक्षक सलमान खतीब आदींनी सीसीटीव्ही व मोबाइलच्या मदतीने भिवंडी येथून दोन आरोपीना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आराेपींची नावे देण्यास पाेलिसांनी नकार दिला.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस