शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वृद्धेवर अत्याचार करणारा फरार आरोपी अखेर गजाआड

By नितिन गव्हाळे | Published: June 02, 2024 9:44 PM

बोरगाव मंजू पोलिसांची कारवाई, आरोपी खामगाव तालुक्यात राहणारा

अकोला: दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नेऊन एका शेतात वृद्धेवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी युवकास अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी २ जून रोजी अटक केली आहे.

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाळंबी ता. जि. अकोला येथील एका वयोवृध्द महिलेच्या तक्रारीनुसार २८ मे रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास अकोला येथून एसटी बसने ग्राम कोळंबी फाट्यावर उतरली. तेथून खाजगी लक्झरी बसने दाळंबी येथे जाण्यास निघाली व दाळंबी गावाचे पुलाच्या अलीकडे वृद्ध महिला बसमधून खाली उतरली आणि तेथून पायि जात असताना समोरून दोन मोटारसायकलवर तिघे जण आले. एका मोटारसायकलवरील दोन इसमांनी त्यांच्या तोंडाला रूमाल बांधुन व एका मोटारसायकलवरील इसमाने काही बांधलेले नव्हते. त्या तिघांनी वृद्ध महिलेस उचलून रोडचे बाजुचे निंबाच्या शेतात आणले व तोंडाला कापड बांधलेले दोन इसम तेथून निघून गेले. त्या ठिकाणी हजर असलेल्या तिसऱ्या युवकाने वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला सांगितले तर मारून टाकणार अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तेथून त्याचे सोबत आलेल्या दोन इसमांना फोन लावला असता ते आले नाही.

नंतर आरोपी युवक वृद्धेला मारण्याकरीता दगड शोधत असता, वृद्ध महिला तेथून पळून गेली. दरम्यान तिला तिच्या गावातील धर्मा शिंदे व आणखी एक इसम दाळंबी गावाकडे पायी जाताना दिसले. यावेळी वृद्धेने त्यांना आपबिती सांगत, दोघांना आरोपीस पकडा असे म्हटले. गावातील दोघांनीही आरोपी युवकाचा पाठलाग केला. परंतु आरोपी मोटारसायकलवर पळून गेला. त्यानंतर गावातील इसमांनी वृद्धेला तिच्या सोडून दिले. दुसऱ्या दिवशी वृद्धेने बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासात घेतला. घटनेचे गांर्भीर्य ओळखून पोलिस अधीक्षक बच्चनसिंह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर, बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. वेगवेगळे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी व आरोपीने गुन्ह्यात वापरलेले वाहन निष्पन्न करून आरोपी राहूल अर्जुन मोरे(२४) रा. ग्राम शेलोडी ता. खामगाव जि. बुलढाणा याला ताब्यात घेवूनचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याने एकट्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.यांनी केली कारवाईस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बोरगावचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, मनोज उघडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ, एएसआय अरूण गोपनारायण, पोहवा योगेश काटकर, गिरीष विर, नारायण शिंदे, सचिन सोनटक्के, नितीन पाटील, सुदीप राऊत, संदीप पवार, अविनाश पाचपोर, रवि खंडारे, अब्दुल माजिद, वसीम शेख, प्रशांत केदारे,गोपाल ठोंबरे,एएसआय गोविंदा कुळकर्णी यांनी केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी