शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

भररस्त्यात युवतीची टोळक्यांकडून छेडछाड; मध्य प्रदेशातील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 1:12 PM

पोलीस सध्या या व्हिडीओच्या आधारे तपास करत असून लवकरच आरोपींना पकडू असं आश्वासन देत आहे.

अलीराजपूर -  सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात काही मुलांकडून मुलीचा विनयभंग होत असल्याचं दिसून येते. माहितीनुसार, ही घटना अलीराजपूर जिल्ह्यातील बलपूर गावात आयोजित केलेल्या भगोरिया उत्सवात रेकॉर्ड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओत काही नराधमांची टोळी मुलीला स्पर्श करत असल्याचं दिसतं. ती मुलगी स्वत:चा बचाव करण्याचाही प्रयत्न करत असते.

हा व्हिडीओ खूप उंचीवरून रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यामुळे मुलांची ओळख पटवणं शक्य होत नाही. पोलीस सध्या या व्हिडीओच्या आधारे तपास करत असून लवकरच आरोपींना पकडू असं आश्वासन देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ज्यात काही मुलं एका मुलीची छेडछाड करताना दिसतात. ही घटना गावात आयोजिक करण्यात आलेल्या जत्रेदरम्यान घडली आहे. भगोरिया उत्सवाचा उल्लेख मध्य प्रदेशातील आदिवासी भागात सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जत्रेपैकी एक आहे.

या प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज सिंह म्हणाले की, पोलिसांनी व्हिडीओची दखल घेऊन गुन्हा नोंदवला आहे. आम्ही त्या युवकांचा शोध घेत आहोत. पोलिसांचे पथक या घटनेची चौकशी करत असून लवकरात लवकर आम्ही आरोपींना ताब्यात घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भूरिया यांनी पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भूरिया यांनी म्हटलं की, ही खूप निंदणीय घटना आहे. जत्रेच्यावेळी पोलीस कर्मचारी कुठे होते? प्रशासनाने लवकरात लवकर या आरोपींना पकडून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी. आम्ही या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकू. आदिवासी महिलेची अशाप्रकारे छेडछाड करणारे मानसिक प्रवृत्तीचे युवक आदिवासी समाजाला नको असं त्यांनी सांगितले. तर काँग्रेस आमदार मुकेश पटेल यांनी ही घटना लज्जास्पद आहे. त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. भगोरिया उत्सवात अशाप्रकारे युवकांना जागा नको. पीडितांना न्याय देण्याचं काम पोलिसांनी करावं असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश