शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Crime News: नातवानेच केला आजीचा खून, हातातील कड्याच्या सहाय्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 9:19 AM

हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे मंगळवार (दि.२३) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समजले

औरंगाबाद/हरसूल : लहानपणी जन्मदात्या आईपेक्षा आजीलाच नातवांची खूप काळजी आणि जबाबदारी सांभाळावी लागते. परंतु, रक्ताच्याच नात्याला हल्ली काळिमा फासली जात आहे. हरसूलमध्ये नातवानेच सांभाळ करणाऱ्या आजीच्याच कुरवळणाऱ्या कुशीवर घाव घातल्याने आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगुबाई रामा गुरव असे मृत आजीचे नाव असून या घटनेमुळे हरसूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हरसूल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे मंगळवार (दि.२३) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समजले. कुटुंबातील गंगुबाई रामा गुरव (वय ७०) या आजीबाईच्या उजव्या डोळ्याजवळ नातू दशरथ गुरव (वय २२) याने हातात घातलेल्या कड्याच्या सहाय्याने वार केले आहेत. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, दुपारपर्यंत हरसूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. 

दरम्यान, नातवानेचे आपल्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ,पोलीस कर्मचारी एस. सी.जाधव,पी.एम.जाधव अधिक तपास करीत आहे. या अगोदरही हरसूल भागात अशीच घटना घडली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद