रायपूर : छत्तीसगडच्या दुर्गमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पत्नी बेडरुममध्ये रोमान्स करत होते तेवढ्यातच एक चोर त्यांच्या घरात घुसला. पती -पत्नीला त्या अवस्थेत पाहून त्याने चोरी करायचा सोडून भलतेच कृत्य केले. हा चोर अशिक्षित नाही तर चांगला इंजिनिअर झाला होता. सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून चोरी करायला लागला होता.
पती पत्नी रोमान्स करत असताना चोराला वेगळीच शक्कल सुचली. चोरीतून किती पैसे, दागिने मिळणार त्यापेक्षा यांना ब्लॅकमेल करू असा विचार करून त्याने या दोघांचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली. नंतर तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी चोराने त्या घर मालकाला व्हॉट्सअपवर त्यांचाच त्या अवस्थेतील व्हिडीओ पाठविला. तसेच १० लाख रुपये द्या नाहीतर व्हायरल करण्याची धमकी दिली.
यामुळे धक्का बसलेल्या दाम्पत्याने पोलिसांशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी आरोपी विनयकुमार साहूला अटक केली. चोराने चोरी केलेल्या फोनचा यासाठी वापर केला होता. पकडले जाणार नाही या विश्वासाने त्याने त्या चोरीच्या मोबाईलवरून घर मालकाला मेसेज केले होते. हा फोन चोरीची तक्रार आल्याने ट्रॅकिंगला लावलेला होता. चोराने फोन सुरु करताच तो ट्रॅक झाला आणि पकडला गेला, असे दुर्ग पोलिसांनी सांगितले.
इंजिनिअर असलेल्या साहूने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले होते. परंतू तो असफल झाला होता. यामुळे त्याने चोरी करण्याचे ठरविले होते. त्याने भाजी बाजारातून काही फोन चोरी केले होते. यापुढे तो काही जाऊ शकला नव्हता. तो एवढा आळशी होता की दरवेळी एकाच जागेवर फोन चोरी करायचा. आश्चर्यकारक बाब म्हणजे या चोराने या दांम्पत्याच्या घरी आधी दोनवेळा चोरी केली होती. यावेळीही तो सफल होईल असे त्याला वाटले होते. आतमध्ये जाताच त्याच्या मनात वेगळेच आले आणि यातून जास्त पैसे मिळतील असे वाटून त्याने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.