पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 07:11 PM2022-07-24T19:11:07+5:302022-07-24T19:11:47+5:30

Immoral Relationship : आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला इतकेच नाही तर त्याची दुचाकीही खड्ड्यात फेकून दिली.

The husband gave terrible punishment to his wife's lover, killed him and burnt his body in the forest | पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला

पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला

googlenewsNext

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात नेऊन जाळला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आरोपीच्या पत्नीला फोनवरून त्रास देत असे, त्यानंतर पतीने तिच्या हत्येचा कट रचला.

आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला इतकेच नाही तर त्याची दुचाकीही खड्ड्यात फेकून दिली. महू तहसीलमधील बरगोंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. मांगलिया गावात बुधवारी एक मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण एका महिलेला फोनवरून त्रास देत असे, त्यामुळे महिलेच्या पतीने मित्रांसह तरुणाची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला. जंगलात मेंढपाळांना एक मृतदेह जळताना दिसला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

मृताची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली. किशनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील कटकट खेडी गावातील बेपत्ता तरुण हंसराज चौहान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. एसपी (ग्रामीण) भागवत सिंह विरडे यांनी सांगितले की, मृत व्यक्ती महिलेला फोन करत असे, त्यांचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार महिलेच्या पतीला कळताच त्याने मित्रांसह तिची हत्या करून मृतदेह जाळला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कुशलगड येथे जात असताना आरोपींनी हंसराजच्या डोक्यात काठीने प्रहार करून त्याची हत्या केली. मृतदेह जंगलातील खंदकाखाली जाळला होता. पोलिसांना माहिती मिळू नये म्हणून त्यांची दुचाकी जाम गेटच्या खाली असलेल्या खड्ड्यात फेकली.

Web Title: The husband gave terrible punishment to his wife's lover, killed him and burnt his body in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.