नवी दिल्ली - बिहारमधील बगाहामध्ये एक अजब प्रकरण समोर आलं आहे. विवाहित महिला प्रियकरासह फरार झाली आहे. पत्नी पळून गेल्यामुळे हैराण झालेल्या पतीने थेट पोलीस ठाणे गाठून पत्नीला परत मिळवून देण्याची पोलिसांना विनंती केली आहे. आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहते, त्यामुळे पोलिसांनी पत्नीला परत आणावं, असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. या प्रकरणामुळे स्थानिक पोलीसही संभ्रमात पडले आहेत. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बगहा येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील रहिवासी असलेले ओमप्रकाश राव जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतात. ओमप्रकाश जयपूरमध्ये असताना त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह फरार झाली. आपल्या दोन्ही मुलांना घरी सोडून ती निघून गेली. पती ओमप्रकाश घरी आल्यावर पत्नी प्रियकरासह फरार झाल्याची माहिती मिळाली. या घटनेने ओमप्रकाश यांनाही धक्का बसला.
तब्बल 50 हजारांची रोकड आणि दोन लाखांचे दागिने घेऊन पत्नी फरार झाल्याचं पीडितेचा पती ओमप्रकाश याने पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. त्याचवेळी पत्नीला दोन्ही मुलांचं यापुढे काय होऊल याबाबत काहीच वाटलं नाही आणि ती प्रियकरासह पळून गेल्याचं ओमप्रकाशने सांगितले. या घटनेने ओमप्रकाश खूप अस्वस्थ झाला आहे. तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.
ओमप्रकाश यांनी सांगितले की त्यांची पत्नी 7 वर्षांचा मुलगा आणि 11 वर्षाच्या मुलीला सोडून पळून गेली. नौरंगिया पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरवर कारवाई न झाल्याने ओमप्रकाश राव यांनी एसपीकडे तीनदा अर्ज केला आहे. ओमप्रकाश यांनी अर्ज देऊन डीआयजींकडेही दाद मागितली आहे. ओमप्रकाश राव यांनी सांगितले की, तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. पत्नीच्या विश्वासावर त्यांनी संपूर्ण कुटुंब इथेच ठेवलं होतं. याच दरम्यान, पत्नीचा एका तरुणाशी संपर्क आला आणि ती मुलांना सोडून पळून गेली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.