म्हारळ - टिटवाळा येथील उंभरणी येथे पाण्याच्या टाकीजवळ महिलेने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. मात्र या महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपीस 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धृपदा जयराम वाघे ( वय 40 ) यांनी 6 फेबुवारी राेजी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले हाेते. हा हत्येचा प्रकार असल्याचा पोलिसाना संशय होता. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर कल्याण ता. पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश त्र्यंबक वाघे असं अटक केलेल्या संशयित आरोपी दिराचं नाव आहे. तर धृपदा जयराम वाघे असं हत्या झालेल्या वहिनीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी मृत धृपदा यांचा आपल्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
चौकशीदरम्यान धृपदा यांची बहिण आशा वाघे आणि दीर सुरेश त्र्यंबक वाघे यांच्याशी जमिनीवरून वाद सुरू असल्याची माहिती पाोलिसांना मिळाली. सुरेश वाघे यास पाेलिसांनी ताब्यात घेतले असता जमिनीच्या वादातूनच धृपदा हिचा हाताने गळा आवळून खून केल्याचीआरोपी सुरेश वाघे यांच्यावर संशय आहे. संशयित आरोपी सुरेश वाघे याला अटक करण्यात आली आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.सदर आरोपीस 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी सांगितले