वॉशिंग्टन : सहा वर्षांचा बालक शाळेत हॅण्डगन घेऊन आल्याची घटना अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील नोरफोल्क येथे घडली. या प्रकरणी मुलाच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेत अल्पवयीन मुलाने शाळेत बंदूक आणल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
लेट्टी एम. लोपेझ यांच्या बालकाने लिटल क्रीक एलिमेंटरी शाळेमध्ये बंदूक आणली होती, असे नोरफोल्क पोलिसांनी म्हटले आहे. मुलाजवळ बंदूक असल्याचे आढळून येताच शाळा प्रशासनाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी आले. एका कर्मचाऱ्याने शस्त्र चालवून पाहिले. तेव्हा ते गोळ्यांनी भरलेले असल्याचे आढळले. यात कोणीही जखमी झाले नाही.
गोळ्यांनी भरलेली बंदूक बालकाच्या हाती पडू देऊन त्याच्या गुन्ह्यास हातभार लावल्याप्रकरणी लोपेझ (३५) याच्यावर गुन्हा दाखल करून फौजदारी समन्सवर त्यांची सुटका करण्यात आली.
बसमध्ये दाखवली होती बंदूकयापूर्वी पेनिसेल्विनिया प्रांतातील नॉरिस्टाऊन शहरात अशीच घटना घडली होती. सहा वर्षांचा बालक शाळेच्या बसमध्ये बंदूक दाखवत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी मुलाकडून बंदूक जप्त केली.