साध्वी प्रज्ञा यांना सेक्सटॉर्शन कॉल करणार्यांनी अशी घडवली घटना, चौकशीत झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 18:02 IST2022-02-17T18:01:41+5:302022-02-17T18:02:11+5:30
Sextortion Call :चौकशीत त्याने गुन्हा करण्याचे दोन मार्ग सांगितले. या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे.

साध्वी प्रज्ञा यांना सेक्सटॉर्शन कॉल करणार्यांनी अशी घडवली घटना, चौकशीत झाला खुलासा
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सेक्सटोर्शन कॉल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. भोपाळमध्ये चौकशीदरम्यान आरोपीने अनेक खुलासे केले आहेत. चौकशीत त्याने गुन्हा करण्याचे दोन मार्ग सांगितले. या मोडस ऑपरेंडीबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटले आहे.
चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की, ते आधी गुगलवर वरिष्ठ राज्य अधिकारी/नेत्यांच्या मोबाईल नंबरची यादी शोधायचे. सर्चमध्ये सापडलेल्या नंबरवर व्हॉट्सअॅपद्वारे मेसेज पाठवायचे. मेसेजचा रिप्लाय मिळाल्यानंतर तो एक ओळखीचे नाव सांगून चॅटिंग करण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर ते थेट व्हिडीओ कॉल करायचे आणि इतर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ दाखवून व्हिडिओ कॉलरची स्क्रीन रेकॉर्ड करायचे.
स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडीओ बनवल्यानंतर त्या रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन ते फेसबुक मेसेंजरवर पीडितेच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवायचे. हा स्क्रीनशॉट घेऊन ते पीडितेला ब्लॅकमेल करायचे आणि पैशाची मागणी करायचे. ब्लॅकमेल करून मिळालेले पैसे तो त्याच्या बनावट बँक खात्यात जमा करायचा आणि टोळीचे इतर साथीदार एटीएममधून पैसे काढून आपापसात वाटायचे.
संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल
भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना तिच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून सेक्सटोर्शन करून धमकी देणाऱ्यांविरुद्ध कलम ३५४ (अ), ५०७, ५०९ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सायबर क्राईमशी संबंधित असल्याने सायबर क्राईम भोपाळने तपास केला होता.
सायबर क्राईम टीमने मोबाईल नंबरच्या लोकेशनच्या आधारे आरोपीची ओळख पटवली, जो बास तहसील नगर पोलीस स्टेशन सीकरी जिल्हा भरतपूर, राजस्थान चांदा गावचा आहे. पोलीस पथकाने 5 दिवस सतत आरोपींची ओळख पटवून आणि त्यांच्याकडून घटनेचे ठिकाण शोधून काढली.
भोपाळ पोलिसांच्या पथकाने मोहरीच्या शेतात नाकाबंदी करून आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील दोन आरोपींकडून 03 मोबाईल आणि 04 सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. वारिस खान आणि रवीन खान अशी अटक आरोपींची नावे आहेत.