शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
3
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
4
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
5
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
6
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
7
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
8
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
9
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
11
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
12
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
13
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
14
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
15
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
16
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
17
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
18
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
19
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
20
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा

जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 6:29 AM

साताऱ्यातील घटना; वडिलांना सोडण्यासाठी तरुणीचा होता अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत व जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलमांन्वये चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुण्यातील तरुणीने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी, मुंबई), जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. हा प्रकार ३, ९ तसेच १० डिसेंबरला घडला आहे.

प्रकरण काय? nतक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे. यासाठी संशयित एक आणि दोन यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले तसेच जामीन करून देतो म्हणून न्यायाधीश निकम यांच्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या एमएसईबी कोडमध्ये चर्चा करण्यात आली. n१० डिसेंबरला संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासाेबत अनोळखी व्यक्तीने तक्रारदार तरुणीकडे पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखविली. त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या, असे सांगून लाच रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Courtन्यायालयBribe Caseलाच प्रकरण