शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 8:19 AM

घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. स्वागताची तयारीही झाली, पण....

मुंबई : घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. तिच्या स्वागताची तयारी झाली. मात्र, बोगस डॉक्टर आणि परिचारिकेमुळे घरातील पाळण्यात चिमुकलीला खेळवण्याऐवजी तिच्या अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ शिवाजीनगर येथील कुटुंबीयांवर ओढवली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डॉक्टरसह परिचारिकेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

नागपूरचा रहिवासी असलेला टॅक्सी चालक सोहेल हुसेन (२८) हे वडील, ४ भाऊ आणि पत्नीसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी त्यांचा राबियासोबत विवाह झाला. राबिया गर्भवती असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. जुलैमध्ये राबिया शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या आईकडे राहण्यास गेली. तेथीलच आर. एन. मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मेहताब व नर्स सोलिया यांच्याकडे तपासणीसाठीजात होती.  १७ तारखेला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राबियाने मुलीला जन्म दिला. मात्र, तिची हालचाल होत नसल्याचे जाणवले, तिला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी सोबत डॉ मेहताब व हॉस्पिटल प्रशासनाकडून बालकास  ऑक्सिजन मास्क व ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नव्हती. चिमुकलीला आधी मुस्कान  नंतर राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला मृत घोषित केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी मेहताबशी संपर्क करीत रुग्णवाहिका सोबत का नाही पाठवली, याबाबत चौकशी केली. तेव्हा फोन बंद करीत डॉ. मेहताब पळून गेल्याचे स्पष्ट झाले.

नर्सिंग होमच बेकायदा ...डॉ. मेहताब हा वैद्यकीय सेवा देण्याकरिता अधिकृत-नोंदणीकृत डॉक्टर नसल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली, तसेच नर्स सोलिया हिने नर्सिंगबाबतचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसल्याचे समजले, डाॅ. जाकिरअली खान व त्याचा मुलगा अल्ताफ खान यांनी आर. एन. मेमोरियल हॉस्पिटलची महानगरपालिकेमधील आरोग्य विभागात नोंदणी न करता, अनधिकृतरीत्या नर्सिंग होम चालवल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दुजोरा दिला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर