मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील जावर पोलीस ठाण्यात २००७ साली नानकराम रामेश्वर गवळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पोलिसांनीअटकही केली होती. आरोपीला कोर्टातून जामीनही मिळाला होता, पण त्यानंतर तो फरार झाला आणि कोर्टात गेलाच नाही. न्यायालयाने त्याला अटक करून हजर करण्याचे सक्त आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.दरम्यान, नानकराम हा सध्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे राहत असून त्याने जादूगाराचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीने त्याचे दुसरे आधार कार्डही तेथे बनवले होते.जावर पोलीस स्टेशनचे टीआय शिवराम जाट यांनी सांगितले की, फरार असताना नानकरामने ग्वाल्हेर, लखनौ आणि मुझफ्फरपूरमध्ये जादूची कला शिकली. नंतर त्याने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आपले शो करायला सुरुवात केली. त्याच्यासोबत एक संपूर्ण टीम होती, ज्यामध्ये अनेक मुली होत्या.
योग शिकवण्याच्या नावाखाली मुलींचे लैंगिक शोषण, तोतया शिक्षकाला अटकबलात्काराचा आरोपी नानकराम हा बिहारमधील पाटणा येथे जादूचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक खंडवा येथून निघून गेले. तिथे या टीमने नानकरामचा संपूर्ण शो प्रेक्षक म्हणून पाहिला आणि जादूचा शो संपताच त्याला अटक केली.