मॉडेल तिच्या वाढदिवशी आढळली मृतावस्थेत, पतीनेच हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:00 PM2022-05-13T22:00:16+5:302022-05-13T22:07:00+5:30
Kerala model Sahana found dead : सहानाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर 13 मे रोजी पोलिसांनी तिचा पती सज्जादला ताब्यात घेतले.
सहाना ही केरळच्या कोझिकोड येथील एक तरुण मॉडेल आणि अल्पावधीत अभिनेत्री बनली. गुरुवारी, 12 मे रोजी तिचा 21 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र वाढदिवस हा दिवस दुःखद दिवस म्हणून संपेल असं तिच्या कुटुंबियांना वाटलं नव्हतं. त्यानंतर रात्री 1 च्या सुमारास कासरगोड जिल्ह्यात राहणाऱ्या तिच्या कुटुंबाला सहाना मृतावस्थेत आढळल्याचा फोन आला. सहानाच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप केल्यानंतर 13 मे रोजी पोलिसांनी तिचा पती सज्जादला ताब्यात घेतले.
“माझी मुलगी आत्महत्या करून कधीच मरणार नाही, तिची हत्या झाली. पती तिच्यावर अत्याचार करत आहेत असे म्हणत ती सतत रडायची. तो दारूच्या नशेत राहून त्रास द्यायचा. त्याचे आई-वडील आणि बहीणही तिच्यावर अत्याचार करत होते, मग मी त्यांना वेगळ्या घरात राहायला सुचवले. त्यानंतरही माझ्या मुलीने मला सांगितले की, तो तिच्याशी वाईट वागतो आणि तिला पैसे हवे होते. आम्ही दिलेले सोने पैशासाठी वापरले होते. तिला तिच्या वाढदिवशी आम्हाला भेटायचे होते,” असे सहानाच्या आईने मीडियाला सांगितले. सज्जाद सहानाला तिच्या कुटुंबाला भेटू देणार नव्हता किंवा त्यांना घरात बोलावणार नाही असा आरोपही त्यांनी केला.
कासरगोड जिल्ह्यातील चेरुवाथूर येथील मूळ रहिवासी असलेल्या सहानाने अनेक दागिन्यांच्या जाहिरातींमध्ये काम केले असून सुमारे दीड वर्षांपूर्वी सज्जादशी लग्न केले आहे. यापूर्वी कतारमध्ये नोकरीला असलेला सज्जाद सहानासोबत कोझिकोड येथील घरात राहू लागला. सासरा आणि मेव्हणी सज्जादसह तिचा छळ करत असल्याचे सहानाने घरच्यांना सांगितले. तेव्हा तिच्या आईने या जोडप्याला घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला. काही आठवड्यांपूर्वी ते कोझिकोड शहरातील पारंबील बाजार येथे भाड्याच्या घरात राहायला गेले.
“तिने एका तमिळ उपक्रमात (Tamil Venture) काम केले आणि त्यासाठी तिला अलीकडे काही पैसे मिळाले. यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते. काल तिचा वाढदिवस होता, पण पती उशिरा परत आला. त्यानंतर या जोडप्यामध्ये आणखी एक वाद झाला. पतीच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर तिला बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळले, असे” एसीपी के सुदर्शन यांनी टीएनएमला सांगितले. ते पुढे म्हणाले की, पोलिसांना बाथरूममध्ये प्लास्टिकची दोरी सापडली. “पण आत्महत्येने मरण्यासाठी ते पुरेसे आहे की नाही हे आम्हाला माहित नाही. आम्ही तपास करत आहोत,” पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.