शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ‘त्या’ बेकरी कामगाराच्या मृत्यूला आधिकारी, ठेकेदारांचा निष्काळजीपणा कारणीभूत!

By अझहर शेख | Published: March 04, 2023 5:50 PM

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक : मागील वर्षी ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेपासून रात्री उशीरापर्यंत मुसळधार पाऊस झाला होता. यावेळी द्वारकेकडून काजी कब्रस्तानसमोरील पखालरोवरील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पाण्यातून वाट काढताना सायकलस्वार बेकरी कामगार असलेला बबलू वकील खान (२३) या सायकलस्वार तरुणाचा वीजप्रवाहचा धक्का बसल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी एका खासगी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांसह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

८ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. द्वारकाजवळील पखालरोड येथे सखल भाग असल्याने दुभाजकापर्यंत पाण्याचा तलाव तयार झाला होता. जुने नाशिकमधील नानावली भागातील बेकरीत काम करणारा बबलू खान हा तरुण हा रस्ता शॉर्टकट असल्याने सायकलवरुन घराकडे द्वारकामार्गे लवकर पाेहचण्याचा प्रयत्ना होता. त्यामुळे त्याने पाण्यातून वाट काढण्यासाठी सायकल साचलेल्या पाण्यात टाकली असता त्यास वीज प्रवाहचा जोरदार धक्का लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मुंबईनाका पोलिसांनी अकस्मात नोंद करुन घटनेचा तपास सुरू केला.सहा महिन्यानंतर बबलू खान याच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत ठरलेल्या संशयितांची नावे समोर आली आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भगवान हरी भोये (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खासगी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक संशयित रत्नाकर कृष्णदेव मिश्रा (रा. पाथर्डी फाटा), अभियंता विशाल देविदास गायखी, (रा. उत्तरानगर) आणि ठेकेदार निलेश गिरीधर कुवर( रा. सिडको) यांच्यावर बबलु खान याच्या मृत्यसू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक संदीप पाटील हे करीत आहेत.

...म्हणून झाला शॉर्टसर्किट! -पखालरोडवर असलेल्या मनपाचा पथदीपाची (क्रमांक एनई१५ जीएससी २-४५) दुरूस्ती करणारे खासगी कंपनीचे मिश्रा, गायखी व कुवर यांनी निष्काळीजपणा केला. यामुळे पथदीपामधील विद्युत प्रवाह साचलेल्या पाण्यात उतरला. संबंधितांनी विद्युत खांबाला वीजप्रवाह नियंत्रित करण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने लागणारे ‘ईएलसीबी’ व ‘एमसीबी’ बसवलेले नव्हते. त्यामुळे वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक