नागौर - राजस्थानच्या नागौर पोलिसांना आव्हान देणाऱ्या कमला चौधरीला अटक करण्यात आली आहे. स्वत:ला लेडी डॉन म्हणवणाऱ्या कमलाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओद्वारे नागौर एसपीसह काही नेत्यांना खुले आव्हान दिले. तिने शस्त्रासह व्हिडिओ अपलोड केला, त्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिच्यावर शस्त्रास्त्र आणि आयटी कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागौरमध्ये तिचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. ती तिच्या स्कूटीवरून कुठेतरी जात होती. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी तिला जोधपूर रोडवरून अटक केली. सध्या जयल पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहे.काही दिवसांपूर्वी कमला चौधरी यांनी एका व्हिडिओद्वारे एसपींना चॅलेंज केले होते की, ती ड्रग्स घेते. जमलं तर थांबवा. तसेच, तिने शस्त्रासह व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. याआधीही तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण त्याचा कमलावर काहीही फरक पडला नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमला ही बुधवारी रात्री शहरातील रस्त्यांवर बिनधास्त फिरत होती. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तिच्यावर मोठी कारवाई केली.
कमलाने व्हिडीओ पोस्ट करून म्हटले होते की, जर कोणात हिम्मत असेल तर...कमला चौधरी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून नागौर पोलिसांना आणि अनेक नेत्यांना धमकावले होते. तिने अनेक सरपंचांची नावेही घेतली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कमला म्हणाली होती, 'मी रोज एमडी घेते. मी ते स्वतःच पैशाने घेते. एसपीकडून पैसे घेऊन खात नाही. कोणाच्या बापात ताकद असेल तर त्याला अडवून दाखवा. एसपी माझे रेकॉर्डिंग पाहत आहेत. कधी त्यांच्या बंगल्यावर येऊन पैसे मागितल्याचे सांगावे. त्याला प्रत्येक मार्गाने नागौरमध्ये हायलाईट व्हायचे आहे. ती कोणाला घाबरत नाही.पोलिसांनाही तिच्याएमडी खाण्याने काहीच अडचण नाही, असे ती म्हणाली होती. तिने आतापर्यंत अनेक पोलिसांना कामावरून काढून टाकले आहे. कमला चौधरी हिच्यावर डिसेंबर 2020 मध्ये नर्सिंग ऑफिसरला ब्लॅकमेल करून 11 लाख रुपये उकळल्याचा आरोप असल्याची माहिती आहे. यानंतर नागौर पोलिसांनी तिला अटकही केली.