शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

सलमान खानला रस्त्यावरच मारण्याचा होता प्लॅन; २ वेळा प्रयत्न फसला, खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 7:56 AM

मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसच्या रस्त्यावरच मारण्याची योजना लॉरेन्स गँगने  बनवली होती, असा नवा खुलासा समोर आला आहे. 

मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला. लॉरेन्स गँगने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ल्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कपिल पंडित याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येच्या कट रचल्याचे उघड करून कटाची माहिती पोलिसांना सांगितली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानला मारण्याचा कट रचला होता. गोल्डी बराड या प्लॅनचा सर्वेसर्वा होता. त्याने सलमानची हत्या करण्यासाठी कपिल पंडित (लाॅरेन्स टोळीचा शार्पशूटर) याची निवड केली होती. 

शूटर्स दीड महिना थांबले, रेकीही केलीमुंबईच्या पनवेल भागात कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर भाड्याची खोली घेऊन थांबले होते. कारण, सलमानचे फार्म हाऊस याच भागात आहे. जवळपास दीड महिना ते या भागात थांबले होते. लॉरेन्स गँगच्या शूटर्सनी हल्ल्यासाठी खोलीत छोटी शस्त्रे, पिस्तूल व काडतूस ठेवले होते. हिट ॲण्ड रन घटनेनंतर सलमान खान गाडीचा वेग कमी ठेवतो. सलमान जेव्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर येतो. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक शेराही असतो, अशी माहिती या शूटर्सनी गोळा केली होती. 

सलमानची हत्या का करायची आहे? सलमानने काळविटाची शिकार केल्यापासून लॉरेन्स त्याच्यावर नाराज आहे. तो तेव्हापासून सलमानची हत्या करू इच्छितो. आपला समुदाय काळविटाचा रक्षक आहे. त्यामुळे आपण सलमानचे प्राण घेऊ इच्छितो, असे लॉरेन्सने म्हटले आहे.

टॅग्स :Salman Khanसलमान खान