शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

दुचाकी सोडण्यासाठी पोलिस शिपायाने मागितली तीन हजारांची लाच, रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 10:53 PM

सचिन गजानन बुधे, असे लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे. तो कारधा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.

भंडारा : जुगार अड्ड्यावर धाड घातल्यानंतर पकडलेली दुचाकी सोडून देण्याकरिता पोलीस शिपायाने पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर तीन हजार रुपयांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. सचिन गजानन बुधे, असे लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे. तो कारधा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी केली.

माहितीनुसार, एका २२ वर्षीय तक्रारदार हा सालेबर्डी येथील रहिवासी आहे. कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने धाड घातली. यात तक्रारदाराची दुचाकी पकडण्यात आली होती. या दुचाकीवर कारवाई करू नये यासाठी तक्रारदाराने कारधा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सचिन बुधे याने कारवाई न करण्याकरिता पाच हजार रुपयांची लाच मागितली. याबाबतची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. प्रकरणाची पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सचिन बुदधे याने तडजोडीयंती तीन हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. तसेच ठाण्यातच पंचासमक्षच तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली.

ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस हवालदार मिथुन चांदेवार, पोलीस शिपाई अतुल मेश्राम, अंकुश गाढवे, चेतन पोटे, विवेक रणदिवे, अभिलाषा गजभिये, राजेश थोटे यांनी केली.

वर्षभरातील पहिली कारवाई -लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जानेवारी महिन्यापासून या वर्षात केलेली ही प्रथमच कारवाई आहे. तीन महिन्यात कुठलीही तक्रार संबंधित विभागणी प्राप्त झाली नव्हती. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पोलीस खात्याच्याच कर्मचाऱ्यामार्फत लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिस