हरियाणातील नूह जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्याला न्यायालयाने आजीवन कारावासाचीशिक्षा सुनावली आहे. जवळपास 4 वर्षे हा खटला चालला. या प्रकरणाची सुनावणी करताना नूह येथील न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांतर्गत आरोपीला 75 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 26 डिसेंबर 2019 रोजी ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती.
अल्पवयीन पीडितेच्या वडिलांनी 27 डिसेंबर 2019 रोजी फिरोजपूर झिरका पोलीस ठाण्यात, आपल्या 7 वर्षांच्या मुलीवर कुणी तरी अत्याचार करून तिची हत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर, पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.
शेळ्या चरायला गेली होती चिमुकली - प्रकरणातील वकील आकाश तंवर यांनी म्हटले आहे की, पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार करत म्हटले होते की, त्यांची 7 वर्षीय चिमुकली 26 डिसेंबर 2019 रोजी रोजच्या प्रमाणेच गावा जवळील डोंगरांवर शेळ्या चारण्यासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी काही लोकांसोबत तिचा शोध घेतला असता ती झुडपात मृतावस्थेचत पडलेली होती.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत - घटनेचा तपास करताना पोलिसांच्या चमूंकडून जवळफासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तपासणी केली. यात एक युवक शेळी घेऊन जाताना दिसत आहे. पीडितेच्या वडिलांना जेव्हा हे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले, तेव्हा त्यांनी त्यांची बकरी ओळखली. आरोपीची ओळख पटल्यानंतर, पुलिसांनी आरोपी मुकीम उर्फ मुक्कीला अटक केली.