व्हॅलेंटाइन हॉटेलमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह अवस्थेत आढळले तरुण-तरुणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:14 PM2022-06-20T13:14:19+5:302022-06-20T13:15:02+5:30
sex Racket Busted : महाराष्ट्र-बंगालमधून मुली होत्या बोलावल्या
इंदूर : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी इंदूरमध्ये वेश्याव्यवसायाचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. अशीच एक घटना लासुडीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जिथे पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथून 10 तरुण-तरुणींना आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पैशांसाठी या मुली देहविक्रीचा धंदा करत होत्या आणि या धंद्यात हॉटेलचे कर्मचारी त्यांना मदत करत होते.
रविवारी दुपारी तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तुळशीनगर येथील व्हॅलेंटाईन हॉटेलवर छापा टाकण्यात आला. येथून पोलिसांनी 10 तरुण-तरुणींना अटक केली आहे.
1000 ते 3000 चा सौदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलची झडती घेतली असता वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पकडलेले सर्व लोक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. चौकशीदरम्यान आरोपी शुभम सिसोदिया हा हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो ग्राहकांकडून 1000 ते 3000 पर्यंत रक्कम घेत असे. त्यातील काही रक्कम मुलींना देण्यात येई. सर्व मुली महाराष्ट्र आणि कोलकाता येथील रहिवासी असून त्या वेश्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत.