शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

ज्वेलर्स दुकान फोडून सव्वातीन कोटींचे सोन्याचे दागिने चोरणारे त्रिकुट जेरबंद!

By अजित मांडके | Published: August 22, 2023 4:10 PM

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरबाजारात गर्दीच्या ठिकाणी मोठी आणि धाडसी घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाणे : उल्हासनगर येथील बहुचर्चित विजयलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे सव्वातीन कोटींचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत माधव चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल आणि  दीपक रामसिंग भंडारी या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता शोध पथकाने नेपाळ येथून जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाख रुपये किंमतीच सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. तसेच त्यांच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर यापूर्वी मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.           उल्हासनगर झवेरी बाजार येथील विजयलक्ष्मी ज्वेलर्स दुकान २७ जून रोजी फोडून त्या दुकानातील तब्बल ३ कोटी २० लाख किमतीचे ०६ किलो सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरबाजारात गर्दीच्या ठिकाणी मोठी आणि धाडसी घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके बनवली होती. याचदरम्यान चोरटे हे नेपाळ मधील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आले. 

गुन्हा दाखल झाल्यापासून चोरटे प्रयत्न करून सुद्धा मिळून येत नव्हते, त्यामुळे हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातच गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखा पथकाने त्याबाबत समांतर तपास करून त्या चोरट्यांबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून  त्यांचा शोध लखनौ, बनारस, नेपाळ- भारत सीमावर्ती भागात घेतला आणि ह्या त्रिकुटाला अटक केली. चौकशी त्यांनी त्या गुन्ह्याची कबुल देत, त्यांच्या कडून ५५० ग्राम वजनाचे ३३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. 

या गुन्ह्याचा पुढे तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहेत. ही कारवाई मालमत्ता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोलीस अंमलदार संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, राजाराम शेगर, रूपवंत शिंदे, किशोर भामरे, नगराज रोकडे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, गीताली पाटील यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी