शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
2
रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर; कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत
3
Ratan Tata Successor: रतन टाटांचा उत्तराधिकारी कोण होणार? अब्जावधींचे साम्राज्य कोण सांभाळणार, ही नावे चर्चेत...
4
रतन टाटा यांच्या निधनावर अंबानी-अदानी यांनी व्यक्त केला शोक, आनंद महिंद्रा यांचीही आदरांजली
5
रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन
6
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
7
फोर्डने केलेला अपमान गिळून रतन टाटा भारतात परतलेले; काळाचे चक्र असे काही फिरले, ९ वर्षांनी... 
8
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
9
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
10
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
11
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
12
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
13
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
14
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
15
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
16
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
17
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
18
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
19
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
20
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली

सीपी स्कॉडमधील सहायक पोलीस निरिक्षकाच्या अंगावर घातला ट्रक; रेती तस्कराने ट्रकसोबत नेले फरफटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 5:54 PM

विशेष म्हणजे, तो ट्रक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश इंगळे यांना रेती तस्कराने ट्रकसोबत काही अंतर फरफटत देखील नेले.

अमरावती : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाने त्याचा ट्रक थेट सहायक पोलीस निरिक्षकांच्या अंगावर नेऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना अर्जुननगर ते पीडीएमसीदरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व अहफाज अहमद (रा. आझादनगर) यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलिसांनी शोएब अहमद व ट्रक चालक रेहान शेख यांना अटक केली आहे.

विशेष म्हणजे, तो ट्रक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगेश इंगळे यांना रेती तस्कराने ट्रकसोबत काही अंतर फरफटत देखील नेले. पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे व पथकातील अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना, त्यांनी गुप्त माहितीवरून एमएच ४८ एजी २४१६ या क्रमांकाच्या ट्रकला अर्जुननगरजवळ थांबण्याचा इशारा दिला. परंतू चालकाने ट्रक थांबविला नाही. त्यामुळे एपीआय इंगळे यांनी पाठलाग केला. ट्रकचालकाने ट्रक अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

प्रसंगावधान राखून इंगळे बाजुला सरकले. त्यांनी ट्रकची एक हुक पकडत कॅबिनमधील चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालक रेहान शेखने ट्रक दामटल्याने इंगळे हे ट्रकसोबत फरफटत गेले आणि त्यानंतर चालकाने काही अंतरावरील कृषी अनुसंधान केंद्राजवळ ट्रक थांबविला. त्यावेळी तेथे पोहोचलेल्या शोएब अहमदने एपीआय इंगळे यांच्याशी हुज्जत घातली. ट्रक कसा नेता, ते पाहतो, अशी धमकी देत त्याने सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.

पंचनाम्याची कागदपत्रे फेकली

दरम्यान, पोलिसांसमोर तलाठी आर. पी वानखडे व मंडळ अधिकारी यशवंत चतुर हे घटनास्थळी पंचनामा करीत असता, ट्रकमध्ये उपस्थित असणाऱ्या शोएब अहमदने मंडळ अधिकारी व तलाठी यांना धमक्या देऊन भाऊ अहफाज अहमदला कॉल करून बोलावून घेतले. काही वेळातच अहफाज अहमद घटनास्थळी पोहोचला. त्याने पंचनाम्याचे कागदपत्रे हिसकावली. मारण्याच्या उद्देशाने तो महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. पोलिसांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी पोलिसांना मारहाण करून हुज्जतबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न सुरु केला असता, अहफाज अहमद तेथून पसार झाला, शोएब अहेमद व रेहान शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ट्रक जप्त केला.याप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपींनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द प्राणघातक हल्ला व शासकीय कामकाजात अडथळा असा गुन्हा नोंदविला.- योगेश इंगळे, सहायक पोलीस निरिक्षक, विशेष पथक

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस