लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटर प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, असा दावा याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. अमित कटारनवरे यांनी शनिवारी केला. शिंदेचे ज्या मुंब्रा बायपासवर एन्काउंटर झाले, त्या ठिकाणची कटारनवरे यांनी पाहणी केली. सत्य शोधून काढण्यासाठी त्यांनी ‘क्राइम सीनचे रिक्रिएशन’ केले. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदविलेल्या बाबी किती जुळतात, हे तपासण्याकरिता ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ गरजेचे होते, असे ते म्हणाले.
या गोष्टी तपासल्या...ॲड. कटारनवरे यांनी तळोजा कारागृहापासून मुंब्रा बायपासपर्यंत, कळवा रुग्णालयात जाऊन सर्व ठिकाणांची पाहणी केली. पोलिसांनी अक्षयला जेलमधून संध्याकाळी ५ः३० वाजता बाहेर काढले.
मुंब्रा बायपास येथे एन्काउंटर घडले, तेथे तो संध्याकाळी ६ ते ६:१५ पर्यंत पोहोचला. मुंब्रा बायपास ते कळवा रुग्णालय किती वेळ लागला? या सर्व गोष्टी त्यांनी तपासल्या.
घटनास्थळाचे फोटो घेतलेnतळोजा येथील दुकानदार, चहा टपरीवाल्यांकडे कटारनवरे यांनी विचारपूस केली.nपुरावे सादर करण्यासाठी घटनास्थळाचे फोटो, व्हिडीओ घेतल्यानंतर ज्या ठिकाणी अक्षयचा मृतदेह ठेवला आहे, त्या रुग्णालयात पाहणी केली.
नातेवाइकांना मृतदेहाजवळ जाण्यास मज्जाव? nमृत अक्षयच्या परिवाराला त्याचा मृतदेह पाहण्यास किंवा मृतदेहाजवळ जाण्यास कळवा रुग्णालय प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले.nपरवानगी घेण्यासाठी कोणीही आले नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.nअक्षयचा मृतदेह दफन करण्याबाबत कळवा रुग्णालय प्रशासनाला शनिवारपर्यंत कोणतेही निर्देश शासनाकडून प्राप्त झालेले नाही.