छत्तीसगढच्या (Chhattisgarh Crime News) बलरामपूर जिल्ह्यातील राजपूर भागात एका महिलेच्या हत्येचा घटना समोर आली आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येच्या आरोपात तिच्या पतीला अटक केली आहे. काटागहना गावात ३१ जानेवारीच्या रात्री महिलेच्या हत्येप्रकरणात आरोपी पतीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. सोबतच ज्या वस्तूने हत्या केली तिही ताब्यात घेतली आहे. दोघेही दारू प्यायलेले असताना त्यांच्यात वाद झाला. पती पत्नीला म्हणाला, तुझं कॅरेक्टर ठीक नाही आहे आणि त्यानंतर त्याने काठीने मारत त्याने तिची हत्या केली.
पोलिसांनी १ फेब्रुवारीला सकाळी सूचना मिळाली की, कोटागहना गावात एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना चौकशीतून आढळलं की महिला आणि तिचा पती घटनेच्या रात्री दोघेही छतावर बसून दारू पित होते. दारूच्या नशेत दोघांमध्ये खूप वाद झाला. पती पत्नीला म्हणाला तुझं कॅरेक्टर ठीक नाही. त्यानंतर त्याने काठीने मारून मारून पत्नची हत्या केली.
पोलिसांनुसार, आरोपी घटनेनंतर फरार झाला. मग पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. या घटनेतून एक बाब समोर आली ती म्हणजे पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. ज्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलीस अधिकारी अखिलेश सिंह यांनी सांगितलं की, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.