सदानंद नाईक
उल्हासनगर : मोबाईलवर पाठविलेल्या लिंकवर तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन ११ लाख २१ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी तिघांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे गिरीष राघानी यांच्या मोबाईलवर एक नोकरी बाबत लिंक आली होती. राघानी यांनी आलेल्या मोबाईल लिंकवर १६ फेब्रुवारी रोजी चॅटिंग केली असता, धर्मवीर, प्रवीण व विपुल पवार यांनी नोकरीसाठी अर्ज भरण्यास सांगून एक ऑनलाईन खाते उघडण्यास सांगण्यात आले. उघडलेल्या ऑनलाईन खात्यात सुरवातीला २०० व १०० रुपये टाकण्यास सांगितले. असे करता करता ११ लाख २१ हजार १६५ रुपये ऑनलाईन पाठविले. त्यानंतर राघानी यांनी त्यांना फोन केला असता, मोबाईल फोन बंद आला. याप्रकारने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी धरमवीर, पुनीत अहमद व विपुल विशाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करीत आहे.