अमेरिकेच्या यूनिवर्सिटी ऑफ ऑरलियन्समधील एका युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. २१ वर्षीय या युवतीनं रात्री उशिरा उबेरनं प्रवास केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह रुग्णालयात आढळला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली असून पोलीस या घटनेचा शोध घेत आहेत. या मुलीला एका खासगी वाहनानं कुणीतरी रुग्णालयात सोडून निघून गेला असं पोलिसांनी सांगितले.
संबंधित घटनेनंतर उबेरनं ड्रायव्हरचा कंपनीचा परवाना रद्द केला आहे. मात्र या युवतीचा मृत्यू नेमका कसा झाला? संशयाची सुई वाहन चालकावर जात आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, २१ वर्षीय सियाया जॉर्डन वेटस्टोन यूनिवर्सिटी ऑफ ऑरलियन्सची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी रात्री ती मित्रांसोबत फिरायला गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळला. पोलीस चौकशीत आढळले की, जेव्हा युवतीला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.
शुक्रवारी तिने मित्रांसोबत कार्निवल परेडला हजेरी लावली होती. तिची मैत्रिण ज्युलिएटनं सांगितले की, रात्री परेड अटेंड करुन ती साडेआठच्या सुमारास निघून गेली. त्यानंतर एका ग्रुपसोबत ती बारमध्ये गेली होती.मग ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत गेली होती. परंतु मध्यरात्री सियाया जॉर्डन वेटस्टोननं निर्णय घेतला की, ती जेंटिली येथील तिच्या घरी जात पाळीव कुत्र्याला पाहायचं होतं. त्यानंतर उबेर ड्रायव्हर घराबाहेर हजर होता. हा ड्रायव्हर तिचा मित्र असल्याचं युवतीच्या रुममधील सहकारी मैत्रिणीने सांगितले. सियाया नशेत होती. मी तिला पुन्हा घराबाहेर पडण्यास नकार दिला तरीही तिने ऐकलं नाही.
तर युवतीचा मित्र रॉबर्टो टॉरेसनं दावा केला की, माझं सियायासोबत रात्री दीडच्या सुमारास बोलणं झालं होतं. तेव्ही ती उबेर टॅक्सीमध्येच होती. तेव्हा ड्रायव्हरनं सियाया तुला पार्टी करणं पसंत आहे का? असं विचारल्याचं ऐकायला आलं. त्यानंतर सियायानं मला नंतर फोन करते म्हणाली पण तिचा फोन आलाच नाही. मी तिला पुन्हा वारंवार कॉल करत होतो पण तिचा कॉल लागला नाही असं त्यांनी सांगितले. तर सियाया जॉर्डन वेटस्टॉनच्या एका स्थानिक रुग्णालयात मृत अवस्थेत सापडली. तर उबेरनं ड्रायव्हरला निलंबित केले असून तपास यंत्रणेसोबत सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे.