शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

सुपारी थुंकतो म्हणत, दिड लाखांचे दागिने घेऊन पसार; सोनाराची सांताक्रुज पोलिसात तक्रार

By गौरी टेंबकर | Published: September 11, 2023 5:55 PM

तक्रारदार चेतन जैन (३५) यांचे सांताक्रुज पश्चिमच्या एमजी रोड याठिकाणी आशिष ज्वेलर्स नावाने दुकान आहे.

 

मुंबई: सोनाराच्या दुकानात जाऊन एका इसमाने खरेदी करण्याचा बहाणा करत एकूण दिड लाख रुपये किंमतीची सोनसाखळी परिधान केली. नंतर तोंडातली सुपारी थुंकून येतो असे म्हणत ती घेऊन पसार झाला. याप्रकरणी सोनाराने सांताक्रुज पोलिसात धाव घेतल्यावर चोराच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तक्रारदार चेतन जैन (३५) यांचे सांताक्रुज पश्चिमच्या एमजी रोड याठिकाणी आशिष ज्वेलर्स नावाने दुकान आहे. त्या दुकानांमध्ये ८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. त्यातील एकाने बहिणीच्या लग्नासाठी जवळपास अडीच लाख रुपयांचे दागिने खरेदी करायचे आहेत असे जैन यांना सांगितले. त्यानुसार त्यांनी विविध दागिन्यांचे सेट काढून दाखवायला सुरुवात केली. तेव्हा त्या इसमाने एक सोन्याची चैन आणि ब्रेसलेट हवी असल्याचे सांगितले.

त्यापैकी चैन परिधान करत सुपारी खाल्ल्याने ती थुकुन येतो असे म्हणत दुकानाच्या बाहेर गेला आणि परत आलाच नाही. तेव्हा जैन यांनी त्याच्या सोबत आलेल्या मनीष तिवारीला (२३) याबाबत विचारले. मात्र त्यालाही काही कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. तसेच त्यांचा अजून एक साथीदार बाहेर ऑटो रिक्षा घेऊन थांबल्याचे तो म्हणाला. त्यालाही जैन यांनी बोलावून आणले. अखेर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि पळून गेलेल्या व्यक्तीचे नाव सुरेश जैन (३४) असून तो राजस्थानचा राहणारा असल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.