शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

खरेदीच्या बहाण्याने महिला चोरट्यांचा कापड दुकानावर डल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 5:04 PM

दिपावलीच्या गर्दीचा फायदा घेत कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ल्या मारला.

ठळक मुद्देदुकानदार, कर्मचारी यांची सतर्कता आणि सीसीटीव्हीमुळे चोरट्यांचा हा डाव उधळला चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवू नका अशी विनवणी

तळेगाव दाभाडे: दिपावलीच्या गर्दीचा फायदा घेत बुधवारी दुपारी येथील मुख्य बाजारपेठेतील गोकुळ कलेक्शन या कपड्याच्या दुकानातील किमती साड्यांवर खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या महिला चोरट्यांनी डल्ल्या मारला. मात्र दुकानदार, कर्मचारी यांची सतर्कता आणि सीसीटीव्हीमुळे चोरट्यांचा हा डाव उधळला गेला. या संदर्भात दुकानाचे मालक रुपेश मनुभाई मेहता(वय ४८,रा.तळेगाव दाभाडे,ता.मावळ)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार (एमएच ४५.एन.६५२२)जप्त केली असून दोन महिलांसह स्विफ्ट चालकास अटक केली आहे.सुरुवातीला चोरट्या महिलांनी एका अल्पवयीन साथीदार मुलीच्या सहाय्याने मौल्यवान तीन साड्या चोरून दुकानालगत उभ्या केलेल्या स्विफ्ट मोटारीच्या डिकीत ठेवल्या.अजून पाच मौल्यवान साड्या चोरत असताना दुकानदार व कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवू नका अशी विनवणी चोरट्या महिला दुकानदार मालकाकडे करत होत्या. महिला चोरट्यांनी साड्या परत करून चक्क कार्ड द्वारे ५० हजार रुपये देण्याचेही कबुल करत होत्या.मात्र दुकानदार रुपेश मेहता यांनी घटनेचे गांभीर्य आणि प्रसंगावधान दाखवत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी दुपारी १.५० ते २ यावेळात चोरट्यांचा हा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या महिला कुर्डवाडी, सोलापूर येथील असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे करत आहे.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस