हडपसर: गाडीच्या विम्याचे १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी. या हव्यासाने गाडी मालकांनी मोटार गाडी चोरी केल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनि त्याचा बनाव उघडा पडला आहे.हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे व पोलीस नाईक विनोद शिवले यांना गस्तीदरम्यान दरम्यान एका खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की,काही दिवसांपूर्वी हडपसर भागातून एक मोटार गाडी क्रमांक (एमएच१२. . पीक्यू.२९७५ )चोरीस गेली. याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील गाडी ही चोरीस गेली नसून ती फियार्दीने वीम्याच्या पैशासाठी गाडी मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमेलगत एका गावांमध्ये लपवून ठेवली होती. सदर गाडी हडपसर मांजरी भागात फिरत असून त्या गाडीचा नंबर प्लेट लावलेली नाही. बातमीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक भांगे यांचे गस्ती पथक फिरत असताना सोलापूर महामार्गावर मांजरी फाटा येथे ही गाडी उभी असल्याची दिसली . गाडी संशय असल्याने दिसल्याने लगेच पोलिसांनी गाडीतीलि चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता. त्याने आपले नाव किरण दत्तात्रेय जाधव (वय २४, रा. पापडे वस्ती, मूळ राहणार खामकरवाडी उस्मानाबाद बार्शी ) असे असल्याचे सांगितले.त्याच्याकडे गाडीचे नंबर प्लेट गाडीचे कागदपत्र बाबत चौकशी करता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यात हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता किरण जाधव यांनी सांगितले की गाडी व्यवसाय करता विकत घेतली होती. परंतु फायनान्स हप्ते भरणे शक्य नसल्याने त्याने त्याची गाडी चोरी केल्याचा बनाव करून एक इफको टोकियो इन्शुरन्स कंपनीकडून गाडीचे पैसे घ्यायचे व गाडी मध्यप्रदेश मध्ये विकून त्याचे सुद्धा पैसे घ्यायचे असा बनाव रचला होता. ठरलेल्या बनावानुसार फियादीर्ने मागील वर्षी २५ सप्टेंबरमध्ये गाडी चोरीस गेल्या बाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी ही गाडीही प्रथम अहमदनगर येथे काही दिवस लपवून ठेवली . त्यानंतरच शिरपूर जिल्हा धुळे येथे लपवून ठेवली. सदर गाडीही मध्य प्रदेश येथील एका इसमास विकण्याचे ठरले होते. परंतु इन्शुरन्स कंपनीला आवश्यक असणारा पोलिसांचा अंतिम अहवाल प्राप्त न झाल्याने गाडीचा व्यवहार होऊ शकला नाही. त्याकरता हडपसरमध्ये आलो होतो. असे जाधव यांनी सांगितले. पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी गाडी चोरीस गेल्याचे खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याने फियार्दीकडून या गुन्ह्याकामी गाडी जप्त करून खोटी तक्रार दिल्याबाबत लष्कर न्यायालयात खटला दाखल केला आहे. तपास पथकाने गाडी जप्त करून १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
विम्याच्या पैश्यासाठी मालकानेच केला चोरीचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2019 9:13 PM