औरंगाबाद - सिडको एन ३ येथील रहिवासी निवृत्त सिवहिल सर्जन एन जी कलवले यांच्या बंगल्यात चोरी झाली असून, चोरट्यांनी सुमारे ८० तोळ्यांचे दागिने आणि रोख पावणे पाच लाख रुपये पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, वरिष्ट पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राप्त माहिती अशी की, सिडको एन ३ मधील बंगला क्रमांक १२ मध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन नामदेव कलवले हे पत्नी , मुलगा डॉ समीर , सून आणि बारा वर्षीय नात यांच्यासह राहतात. कलवले कुटुंब शनिवारी फिरायला मुंबईला गेले आहे. बंगल्याला रोज सकाळी भेट देण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्याकडे काम करणारी सखूबाई हिच्याकडे दिली आहे. यामुळे ती काल सकाळी येऊन गेली होती आज सकाळी पुन्हा बंगल्यात आली असता तिला मुख्य दाराची ग्रील काढलेली दिसली . या घटनेची माहिती त्यांनी फोन करून डॉक्टर कुटुंबाला कळविली . याविषयी माहिती मिळताच पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचारी दाखल झाले . बंगल्यातून ८० तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख पावणे पाच लाख चोरीला गेल्याचे समोर आले पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे आणि सहायक आयुक्त साळोखे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
निवृत्त सिव्हिल सर्जनचा बंगला फोडून सुमारे ४५ लाखांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 4:17 PM