रुपेश हेळवे, सोलापूर: पाठविलेल्या कांद्याची रक्कम मागण्यासाठी तमिळनाडू येथे गेलेल्या सोलापूरच्या व्यापार्याला पैसे मागितलं आणि जास्त दबाव टाकला तर शहरातून बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी केल्याप्रकरणी तमिळनाडूतील आर. अक्किनेश्वर ऊर्फ अग्नी ( रा. तमिळनाडू) याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आपली ४७ लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी मुजीब निसार अहमद खलिफा ( वय ४३, रा. साखर पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी खलिफा यांचा आरोपी अक्किनेश्वर यांच्यासोबत कांद्याचा व्यापार सुरू होता. या व्यावसायातून ४६ लाख ८४ हजार २२९ रुपयांचे बिल खलिफा यांनी आरोपीकडे मागणी केली. मागणी केल्यानंतर आरोपीने उडाउडवीचे उत्तरे दिली. यामुळे फिर्यादी हे आपल्या मुलासोबत तमिळनाडू येथे जाऊन फोन केल्यानंतर तुम्ही जर वारंवार पैशाची मागणी करत माझ्यावर दबाव आणला तर तुम्हाला शहरातून बाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याची फिर्याद दिली.