बाली (इंडोनेशिया) - गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे. मोबाइलचा पासवर्ड न सांगितल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची घटना इंडोनेशियातील बाली येथे घडली आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या पतीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपासा सुरू केला आहे.डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार इंडोनेशियातील वेस्ट नुसा तेंगारा प्रांतामध्ये ही घटना घडली आहे. येथील इल्हाम चहयानी या महिलेने पती डेडी पूरनामासोबत घरात होती. यादरम्यान कोणत्या तरी विषयावरून त्यांच्यात वादास सुरुवात झाली. त्यानंतर इल्हाम हिने पतीकडे त्याच्या मोबाइल पासवर्डची मागणी केली. मात्र डेडी याने पासवर्ड देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या इल्हाम हिने डेडीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले. या प्रकारानंतर घरातून उसळत असलेल्या आगीच्या ज्वाळा पाहून एका शेजाऱ्याने त्यांच्या घराकडे धाव घेतली. मात्र गंभीररीत्या जळालेल्या डेडीला वाचवणे शक्य झाले नाही. अखेर डेडी याने रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीस ताब्यात घेतले आहे. पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण सुरू झाले होते. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीस मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये पासवर्डवरून पुन्हा भांडण झाले. अखेरीस पत्नीने रागाच्या भरात पतीची हत्या केली.
पासवर्डवरून भांडण झाले, पत्नीने पतीला जिवंत जाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 12:28 PM
गेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे.
ठळक मुद्देगेल्या काही काळामध्ये किरकोळ कारणांवरून पती आणि पत्नीमध्ये होत असलेली भांडणे विकोपाला जात असल्याचे चित्र आहेमोबाइलचा पासवर्ड न सांगितल्याने संतप्त झालेल्या पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची घटना इंडोनेशियातील बाली येथे घडली