मुंबई - डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण आता आग्रीपाडा पोलीस ठाण्याकडून गुन्हे शाखेकड़े वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पुढील तपास करणार आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांची आज पोलीस कोठडी संपत असून त्यांना आज कोर्टात हजर केले असून या तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विशेष कोर्टाने सुनावली आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या भक्ती मेहरेच्या आईने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे, तसंच त्या तिघी देखील निष्पाप असून त्यांना न्यायचे मिळेल. तडवी आत्महत्याप्रकरणी चौकशी झालीच पाहिजे. त्यातूनच सत्य समोर येईल असं भक्तीच्या आईने म्हटले आहे.
'त्या' निष्पाप आहेत; सत्य लवकरच समोर येईल; भक्तीच्या आईने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 3:38 PM
तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी विशेष कोर्टाने सुनावली आहे
ठळक मुद्दे भक्ती मेहरेच्या आईने त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले तिघी देखील निष्पाप असून त्यांना न्यायचे मिळेल.