कल्याण: महात्मा फुले पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला गजाआड केले आहे. आरिफ शेख असे या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसना यश आले असून पोलिसांनि त्याच्याकडून 3 लाख 42 हजरांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरिफ चे दोन साथीदार असलम शेख व मोहमद खान हे फरार असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती.या प्रकरणी पोलीसानी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी आरिफ शेख चिकणघर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे काल दुपारच्या सुमारास महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या पथकाणे चिकणघर परिसरात सापळा रचत आरिफ शेख याला अटक केली तर त्याचे साथीदार असलम शेख व मोहमद खान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत . आरिफ शेख विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून पोलिसांनी 6 गुन्ह्यांची उकल करत त्याच्याकडून 3 लाख 42 हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली .विदेशी पिस्तूलासह तडीपार गुंड गजाआड
कल्याण : कल्याण पूर्व अशोक नगर वालधुनी येथे राहणारा दीपक उर्फ पिंटू घाडगे याला 22 फेब्रुवारी रोजी 2 महिण्याकरिता ठाणे महसुली हद्दीतून तडीपार केले होते .तडीपार केले असताना देखील घाडगे वालधुनी परिसरात फिरत असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकरी दीपक सरोदे याना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे सरोदे यांनी आपल्या पथकासह थेट वालधुनी परिसर गाठत घोडगे याला वालधुनी परिसरातून अटक केली .त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विदेशी बनावटीचे पिस्तुल आढळून आले. दीपक उर्फ़ पिंटू घाडगे विरोधात हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो पिस्तुल कुणाकडून व कोणत्या कारणासाठी घेऊन आला होता याचा तपास सुरू असल्याची माहिती एसीपी अनिल पोवार यांनी दिली .