तु्म्ही चोरीच्या घटना अनेक पाहिल्या असतील. घरफोडी करुन लाखो रुपयांची चोरी. तर कुठे आत्मघातकी हल्ला करुन चोरी. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच चोरीची चर्चा सुरू आहे. काही चोर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते दुसऱ्याचे घर स्वतःचे मानतात आणि मग अगदी आरामात खाऊन पिऊन बाहेर पडतात. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये चोरीची अशीच एक विचित्र घटना घडली आहे.
ही अनोखी चोरीची घटना फ्लोरिडाच्या एस्कॅम्बिया काउंटीमधील आहे. जॅचरी सेठ मर्डोक नावाच्या 29 वर्षीय चोराची कहाणी खूप रंजक आहे. बंद घरात घुसून चोरट्याने आंघोळ करून अगदी आरामात स्वत:साठी कॉफी बनवली. मग अगदी निवांत आनंद घेतला आणि पळून गेला. आता अमेरिकेच्या या अनोख्या चोराची घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर चर्चेत आहे. ही संपूर्ण घटना स्वतः स्थानिक पोलिसांनी फेसबुकवर शेअर केली आहे.
एस्कॅम्बिया काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅचरीने बंद घराच्या मुख्य दरवाजाची काच फोडली आणि नंतर त्यामधून आत प्रवेश केला. यानंतर चोराने तिथल्या बाथटबमध्ये आंघोळ केली . बेडरूममध्ये विश्रांती घेतली. डुलकी घेतल्यानंतर एक कप कॉफी बनवली ती प्यायली आणि मग घराबाहेर पडला.
'ट्रकचे ब्रेक फेल झालेच नव्हते'; नवले ब्रिज अपघातप्रकरणी मोठी माहिती हाती, चालक फरा
तो चोर बसमधून प्रवास करून चोरी करण्यासाठी आला होता. मात्र चुकून त्याने बसचे तिकीट घरातील किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनमध्ये फेकून दिले. त्याच दिवशी दुसऱ्या घरातही चोरीची घटना घडली. त्या एकाच चोराने दोन ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या चोराला ताब्यात घेतले आहे.