वडगाव मावळ : वडगाव बाजार पेठेत किराणा मालाच्या दुकानात माल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांनी दुकानदाराची ९० हजार रुपये किंमतीची तीन तोळे वजन असलेली सोन्याची चैन लंपास केली.
सुरेंद्र सुवालाल बाफना या व्यापा-याने पोलिसांकडे फिर्याद दिली. बाफना यांच्या दुकानात एक जण खरेदीसाठी आला. तीनशे किलो तांदूळ खरेदी केला. दहा दहा किलोचे कट्टे बनविण्यास सांगितले. साखर व तेलाचे डबे घ्यायचे असे सांगितले. आमचे धर्मगुरू थोड्या वेळात येतील.त्यांच्यापुढे असे कपडे घालून व हातात घड्याळ व चैन घालून वस्तू दिलेल्या त्यांना आवडणार नाही. त्यामुळे शर्ट व गळ्यातील चैन काढून ठेवा, असे सांगितले. बाफना यांनी शर्ट काढून त्यात चैन ठेवली.राहिलेले तांदुळाचे कट्टे बनविण्यास सुरवात केली. तोप़र्यंत चोरटा खिशातील चैन घेऊन तेथून पळून गेला.